चुरगळून फेकून
दिल्या होत्या साऱ्या आठवणी .
दूर सारले दिलेघेतले मायेचे
अवकाश
दोन ओळींचा प्रवास देखील
आयुष्य वाटू लागला
शाई आणि सही
ची सांगड
शुभ्र कागदावर ताल धरत गेली
टीप कागदाप्रमाणे कोरडे करत गेली
रेषांच्या सहवासात विरत गेले
भूतकाळाचे ओझे
वाटल जमलाय आपल्याला …
तुझ्याशिवायचा
प्रवास….
परंतु अजूनही कुठेतरी खोलवर
शूभ्र काही जीवघेणे
घट्ट धरून ठेवते आहे ..
आई
अजूनही तू मला
आठवते आहेस,
No comments:
Post a Comment